अस्सल मराठी जेवण देणारं शुद्ध शाकाहारी रेस्टोरेंट: दशमी एक्स्प्रेस – निगडी प्राधिकरण

2 0
Read Time:3 Minute, 25 Second

Pure Veg restaurant serving best Marathi food in Pimpri Chinchwad, Maharashtrian food, Pune Marathi food, Nigdi Marathi food

दशमी एक्स्प्रेस {प्युर वेज} – निगडी प्राधिकरण


घरच्या सारखं अस्सल मराठी जेवण करायचंय?

सोलापूरच्या शेंगदाणा पोळी, बाजार आमटी भाकरी वर ताव मारावा वाटतोय?

अहो अगदी सिंहगडच्या पिठलं भाकरीची आठवण येतेय?
 
मग ‘दशमी एक्स्प्रेसला’ नक्की भेट द्या.
जरा दुपारचा निवांत वेळ काढून मैत्रिणी सोबत गेले होते. छोटेखानी व्यवस्था असलेल्या नेटक्या किचनकडून केवळ घरगुती  टेस्टची अपेक्षा होती आणि ती अगदी पूर्ण झाली.

काय खाल्ले?


अळूवडी + कोथींबीरवडी:

खमंग आणि खुसखुशीत. गप्पांना जसा खुसखुशीत खेचाखेचीने स्टार्टर बसतो तश्याच पद्धतीने जेवणाच्या सुरुवातीला भूक आणि जीभ चाळवण्यासाठी अगदी योग्य. दोन्हीही आवडल्या.


 

बाजार आमटी थाळी:

चरचरीत आमटी सोबत गरमागरम बाजरीची भाकरी, गूळ शेंगदाणे, दही, ठेचा आणि शेंगा चटणी. फ्ककड चव. रंग झणकेबाज होता पण चव तिखट जाळ नव्हती.
भाकरी कुस्करून खाण्यासाठी उत्तम कॉम्बिनेशन.


पुरणपोळी थाळी:

2 गुबगुबीत पुरणपोळ्या, बटाटा भाजी, कटाची आमटी, भात,कुरडई अशी साग्रसंगीत थाळी. घरी पुरणा-वरणाचा घाट न घालता आयत खायचं असेल तर उत्तम पर्याय.पुरणपोळीचा गोडवा अगदी प्रमाणात.
डायबेटिक असल्याचा फील देणारी अगोड नाही पण अगदी ओठाला ओठ चिकटतील एवढी गोड मिट्टपण नाही. आमटीचा कटही उत्तम जमलेला.
 
 

सिंहगड थाळी:

आता अश्या पावसाळ्यात सिंहगडावर जाऊन पिठलं भाकरी चोपण हे शास्त्र असतं हे माहीत आहे पण आता घराजवळच जर तिचा आस्वाद घेता येत असेल तर ही संधी कोण सोडणार? लुसलुशित 2 ज्वारीच्या भाकरी, गरमागरम पिठलं, लाल चटणीवाला कांदा, ठेचा आणि दही…बास्स.. छानच होती. फीलआ गया बॉस!
 


रेग्युलर चपाती थाळी:

3 चपाती, 3 भाज्या, 1 स्वीट म्हणून शिरा होता. घरगुती पाककृती. उत्तम चव.


शेंगदाणा पोळी:

आता ही म्हंजे आपला विकपॉइंट! प्रोपर सोलापूरकर लोकांच्या हातची खाऊन जीभ सरावलिये. इथली छान होती पण अजून सारण हवं होत. बाकी चव अगदी हवी तशी होती तूप लावून खरपूस केलेली.


एकंदरीत शाकाहारी मराठी जेवणासाठी उत्तम जागा आहे. नक्की भेट देऊन आस्वाद घ्या.

 

पत्ता:

दशमी एक्सप्रेस, साई ज्योती अपार्टमेंट, आकुर्डी पोलीस स्टेशनमागे , प्राधिकरण निगडी पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र

https://tinyurl.com/2u4p34x4


Review By: Swati Aware

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *