मोरिंगा म्हणजेच शेवगा :आधुनिक कल्पवृक्ष

moringa seeds
1 0
Read Time:5 Minute, 25 Second

मोरिंगा, शेवगा , मोरिंगा फायदे , मोरिंगा रेसिपी , सुपरफुड , मोरिंगा उपयोग, moringa, Heath benefits of moringa, Moringa recipes

moringa powder

दुर्लक्षित सुपरफूड

भारत हा फळे आणि भाज्यांच्या बाबतीत श्रीमंत देश मानला जातो. येथे तुम्हाला मांसाहाराच्या तुलनेत असंख्य प्रकारचे शाकाहारी पदार्थ पाहायला मिळतील, परंतु माहितीच्या अभावामुळे अनेक असे पारंपरिक भारतीय जिन्नस दुर्लक्षित आहेत. अलिकडे भारतात शेवग्यावर विपुल संशोधन केले गेल्यामुळे शेवग्याचे महात्म्य सर्वत्र सिद्ध झाले आहे. त्यातीलच एक म्हणजे शेवगा किंवा मोरिंगा. संपूर्ण भारतभर शेवगा अनेक वर्षांपासून आवडीने खाल्ला जातो. अनेकविध प्रांतीय रेसिपि घरोघरी पारंपारिक पद्धतीने अजूनही बनविल्या जातात .

शेवग्याचे मूळ उगमस्थान:

Moringaceae कुळातील Moringa म्हणजेच शेवगा हा एकमेव प्रकार असून त्याच्या भारतात विविध प्रजाती आढळतात.  आशिया व आफ्रिका खंड हे शेवग्याचे मूळ उगमस्थान आहे. आपण भारतामध्ये याचा अन्न म्हणून वापर करतो त्या शेवग्याच्या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रीय नाव Moringa oleifera असे आहे. मोरिंगा हा शब्द मुरुंगाई या तमिळ शब्दापासून निर्माण झालेला असून त्याचा अर्थ drumstick किंवा twisted pod असा आहे.

moringa treemoringa flowers

मोरिंगाचे वैशिष्ट्य:

मोरिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची कमतरता असतानाही ते पिकवता येते. हे झाड अगदी मुरबाड जमिनीत देखील कमी पाण्यावर किंवा त्या प्रदेशात पडणाऱ्या नुसत्या पावसाच्या पाण्यावर तग धरू शकते व चांगले वाढू शकते.

शेवग्याच्या प्रत्येक भागाचा काही न काही उपयोग केलं जातो. जसे कि पाने, फुले, फळ, साल आणि मुळेही .

हे अनेक आवश्यक पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. जगभरात याला सुपरफूड म्हणतात.

मोरिंगा म्हणजेच शेवग्याचे आरोग्यास फायदे:

  1. मोरिंगा पाने कॅल्शियम आणि फॉस्फरसचे समृद्ध स्रोत आहेत. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक असतात. 
  2. शेवग्याच्या शेंगा, फुले व पाने हे भाग अन्न म्हणून सेवन केले जातात. 
  3. शेवग्याच्या पानांत भरपूर प्रमाणात A, B, C, K जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व प्रोटीन असल्यामुळे त्याची पाने ताजी खाल्ली जातात तसेच वाळवून पण सेवन केली जातात. त्या वाळवलेल्या पानांची पावडर करून त्याची औषध म्हणून विक्री केली जाते. याच्या कॅप्सूल ही मिळतात.
  4. पानांची पावडर रोज मधात मिसळून सेवन केल्यास त्याचा आरोग्यवर अधिक चांगला परिणाम दिसून येतो.

     5. शेवग्याचे मूळदेखील औषधी असून जंतूनाशक आहे.

    6. शेवग्याच्या शेंगेतील बिया ह्या पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात. तसेच बियांपासून तेल काढले जाते. या तेलाचा केस आणि त्वचेवर लावण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच या तेलाचा सौन्दर्य प्रसाधनांमध्ये आधारभूत घटक म्हणून वापर केला जातो. शेवगामध्ये उपस्थित अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स त्वचेची लकाकी वाढवतात.या तेलाची किंमत दोन ते तीन हजार रुपये लिटर असते. 

7. या झाडाच्या सालीने सूज कमी होते. आदिवासी अजूनही शेवग्याची साल उगाळून शरीराच्या सुज आलेल्या भागावर लावतात.

अन्नाव्यतिरिक्त, मोरिंगा चा उपयोग इंधन, पशुखाद्य, खत आणि सौंदर्यप्रसाधने आणि सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी केला जातो.म्हणूनच आधुनिक कल्पवृक्ष  म्हणून शेवग्याची गणती केली तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

शेवग्याच्या काही सर्वपरिचित डिशेश :

moringa , drumsticks

शेवग्याच्या शेंगाची भाजी, पिठलं

सांबार

शेवग्याचे सूप

शेवग्याच्या पाल्याची भाजी

शेवग्याचा पाला घालून वरण

शेवग्याच्या फुलांची भाजी

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *