Best Maswadi in Hotel Super Shriraj Wakad, BEest Non veg Thali in Wakad,
श्रावणात रक्तात वाढलेल्या हिरव्या पेशी कमी करायच्यात?
श्रावण संपताच आपल्या आवडत्या मांसाहारी बेतावर आडवा हात मारायचाय ?
जुन्नर आंबेगाव भागातल्या अस्सल मासवडी- रस्सा भाकरी कुस्करून हाणायचीये ?
अहो मग अचूक ठिकाण सांगते तुम्हांला..
‘हॉटेल सुपर श्रीराज, वाकड ‘ इथे भेट द्या आणि पुणे ग्रामीण ठसकेबाज चवीचा आस्वाद घ्या.
नारायणगावची भुजबळ बंधूंची मुख्य शाखेतील मासवडीचा 1990 पासूनच सर्वत्र बोलबाला आहे. पुण्यात मासावडी आणणाऱ्या trendsetters पैकी हे एक.हा लेख पात्र Face mask उत्पादनांवर विनामूल्य शिपिंग ऑफर करतो किंवा ऑनलाइन खरेदी करतो आणि आजच वैद्यकीय विभागातून स्टोअरमध्ये पिकअप करतो
नेहमीप्रमाणे दोन शाकाहारी माणसं आणि दोन मांसाहारी प्राणी इथे पोचलो.
तिथे पोचलो आणि धो-धो पाऊस चालू झाला. त्याने भुकेत अजूनच भर पडली..
गरमागरम अळणी सुपने श्रीगणेशा केला आणि खिमा, खर्डा, ड्राय मसाला, रस्सा अश्या वेगवेगळ्या वेशात आलेल्या बोकडावर आडवा हात मारला.
शेवटी अळणी इंद्रायणी भात आणि एकदम ‘मन:शांती फिलिंग ‘
सोबतच्या शाकाहारी मैत्रिणींनी शेवभाजी आणि मासवडी थाळी उत्तम असल्याचा अभिप्राय दिला. मला मात्र आज मटण आणि चिकन थाळीने ही माझ्या माहेरची आठवण करून दिली.
उत्तम शिजलेल मटण / चिकन
अजिबात जळजळ होणार नाही असा मस्त गावरान बाजाचा मसाला,
नीट नेटकी बैठक,
उत्तम सर्व्हिस
अमर्यादित भाकरी आणि भात
ही नजरेत भरणारी वैशिष्ट्ये..
अचानक चालू झालेला तुफान पाऊस आणि गरमागरम गावरान जेवण आणि सोबत मैत्रीणी अजून काय हवं एखाद्या खादाड जीवाला!
शेव भाजी थाळी – २००₹
मासवडी थाळी – २५०₹
संपूर्ण चिकन थाळी – ४५०₹
संपुर्ण मटण थाळी – ५५०₹
टीप:
1. बोल्हाई आणि बोकड असे दोन्हीं पर्याय इथे उपलब्ध आहेत. तुम्ही कोणाचा घास घेणार हे ऑर्डर करतांना सांगायची जबाबदारी तुमची..
2. परतीच्या मार्गावर गोडाची सोय करून ठेवा; म्हणजे घरी जाऊन थेट अंथरूणात घुसायला मोकळे.
Bhujbal Bandhu-Hotel Super Shriraj
Near Mankar Chowk, Road, opposite Green Valley Society, Kaspate Wasti, Wakad, Pimpri-Chinchwad, Maharashtra
Location